अहमदनगरमध्ये वाईन शॉपसमोर लागल्‍या रांगा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. नगरमध्ये विविध दुकानांसमोर आधीच रांगा लागलेल्या आहेत.

विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे . तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत. अहमदनगर जिल्ह्यात दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोमवारी रात्री फिजिकल डिस्टन्सिंगची आखणी करण्यात आली.

रात्रभर नगर शहरात हे काम सुरू होते. दुकान मालक जातीने लक्ष देऊन त्यांनी ही आखणी करून घेतली. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच मद्यप्रेमी दुकानांभोवती घुटमळत उभे होते.

सकाळी नऊ वाजता ही गर्दी वाढली. दिलेल्या चौकोनात अनेक उभे होते. हे चौकोनही अपुरे पडले. त्यामुळे दुकानासमोर चौकोनाबाहेरही अनेकजण उभे राहिलेले आढळून आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24