नगर : जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून होणार आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २४ व २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी शहर भाजपाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते.
विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विकास कामांचा झपाटा राज्यात चालवला आहे त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. सर्व योजना थेट जनतेपर्यंत जात असल्याने प्रभावी अंमलबजावणी झाली आहे.
या विकास कामांचे यश घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार हे नक्की.