१ लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लोणी – राहाता तालुक्यातील दुर्गापूर चारी नं. ११ दाढ रोड परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. वैशाली गणेश पुलाटे, वय २७ हिला नवरा, सासू, सासरा व सासरच्या लोकांनी संगनमत करुन माहेरुन गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी पैशाची मागणी करून शिवीगाळ करत मारहाण केली. 

तसेच तिला उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या छळास कंटाळून काल सौ. वैशाली गणेश पुलाटे या तरुणीने लोणी पोलिसांत फिर्याद दिली.

त्यावरून आरोपी नवरा गणेश बाबासाहेब पुलाटे, सासरा बाबासाहेब कारभारी पुलाटे, सासू हिराबाई बाबासाहेब पुलाटे, महेश बाबासाहेब पुलाटे, श्रद्धा महेश पुलाटे, सर्व रा. दुर्गापूर, चारी नं. ११, दाढ रोड, नणंद कविता सुनील माने, रा . मुसळवाडी ता. राहुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24