मिरजगाव : कर्जत – जामखेडमधून रोहित निवडणूक लढत आहे. तुम्ही त्याला आपले पाठबळ द्या. मतदारसंघातील बेरोजगार तरुण व महिला भगिनींना बारामती ॲग्रोच्या माध्यमातून उद्योग उपलब्ध देऊ,विकासाची कामे करताना खरा विकास कसा असतो, तो करून दाखवू , असे, प्रतिपादन बारामती ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.
कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे बारामती ॲग्रोच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. बारामती ॲग्रोच्या वतीने सुरू असलेल्या मोफत पाणी टँकरचे उद्घाटन सौ. सुनंदाताई पवार व उद्योजक सुरेश काका गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कोंभळीचे सरपंच सचिन दरेकर, मा.प.स.सदस्या माधुरी लोंढे, मा. सभापती संगिता उदमले, उद्योजक सुरेश काका गोरखे, खरेदी -विक्री संघाचे मा. संचालक ज्ञानदेव गांगर्डे, माजी सरपंच शिवाजी गांगर्डे, अशोक गांगर्डे, सुभाष गांगर्डे, शिवाजी भापकर, धनराज गांगर्डे, विठ्ठल गांगर्डे, मारुती गांगर्डे, सीताराम गांगर्डे, नितीन गांगर्डे, रामचंद्र गांगर्डे,आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सरपंच दरेकर यांनी, सर्व ग्रामस्थ रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.