अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य करून सतत चर्चेत राहणाऱ्या अनिल वीज यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या विरोधात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अनील वीज हे हरियाणा सरकारमध्ये गृह मंत्री आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. ते ज्याठिकाणी जातात, त्याठिकाणी जाळपोळ होते आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते, अशी वादग्रस्त टीका हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांनी केली आहे.
यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीज यांच्याकडून सातत्याने काँग्रेसवर टीका केली जात आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सीएएविरोधातील आंदोलनात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयाना भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल व प्रियंका गांधी यांना मंगळवारी मेरठ पोलिसांनी परत पाठविले होते.
या पार्श्वभूमी वीज यांनी ट्विटरवरून दोन्ही नेत्यांवर वादग्रस्त टीका केली आहे.