राहुरी :- तालुक्यातील मोमीन आखाडा येथील शशीकांत दत्तात्रय कोहकडे, वय २७ हा तरुण शेतक-याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
दरम्यान मोमीन आखाडा येथील शशीकांत कोहकडे हा संध्याकाळी २८ आपल्या शेतातील विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का लागल्याने तो खाली पडला.
त्याला नातेवाईकांनी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.