मेव्हण्याकडे आलेल्या तरुणीस पळविले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी – राहुरी तालुक्यातील गोट्ये आखाडा येथे नात्याने मेव्हणे असलेले अंबादास साखरे यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथील लक्ष्मण पद्माकर काळे हे कुटुंबासह कंदुरीच्या कार्यक्रमाला आले होते.

यावेळी नात्यातील एक १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी रात्री ९ च्या सुमारास शौचाला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही. या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी कायदेशीर रखवालीतून पळवून नेले.

वरीलप्रमाणे मुलीचे नातेवाईक लक्ष्मण पद्माकर काळे, धंदा नोकरी यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.आरोपी व अल्पवयीन मुलीचा कसून शोध घेत आहेत. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24