रेल्वेखाली उडी घेऊन तिघांची आत्महत्या.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर वांबोरी रेल्वेस्थानकानजीक रेल्वेखाली तिघांनी आत्महत्या केली. त्यात दोन महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

माय-लेकराची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. मात्र, ५२ वर्षांच्या महिलेची ओळख अजून पटू शकलेली नाही. आत्महत्येचे कारणही समजू शकले नाही. 

वर्षा गिरीराज तिवारी-ठुबे (वय ४३), मुलगा अनुप गिरीराज तिवारी (वय ९, रा. केडगाव) अशी मृतांची नावे आहेत.

अमरावती-पुणे एक्स्प्रेस सुपरफास्ट रेल्वे नगरच्या दिशेने येत होती. तिच्याखाली वांबोरी गावाजवळ वर्षा, अनुप व एका महिलेने उडी मारली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. 

अहमदनगर लाईव्ह 24