कोरोना महामारीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला लाॅकडाऊन करुन घेतले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  सत्तेच्या उबेत असलेल्या राहुरी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वर्धापनदिनाचा विसर पडला.

अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणामुळे शिवसैनिक पक्षापासून दूर गेले आहेत. पंधरा वर्षे तालुक्यात भाजपचा आमदार असल्याने शिवसेना आपले अस्तित्व दाखवू शकली नाही.

आता सत्तेवर आल्यावरदेखील सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे काही नियोजन नाही. वर्धापनदिनानिमित्त अन्यत्र कार्यक्रम होत असताना कोरोना महामारीत सेना पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला लाॅकडाऊन करुन घेतले आहे.

‘जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेतले जात नाही. शिवसेनेचे पूर्वीचे धोरण ८० टक्के समाजकारण व २० राजकारण हे होते. आता ८० टक्के राजकारण व २० टक्के समाजकारण झाले आहे का?

तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्थापित राजकारण्यांकडे स्वाभिमान गहाण ठेवून स्वतचा स्वार्थ साधला आहे. एवढे दिवस ज्यांनी पदे उपभोगली, त्यानी शिवसैनिकांसाठी काय केले, असा प्रश्न माजी पदाधिकारी सुरेश लोखंडे यांनी उपस्थित केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24