राहुरी :- मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या अर्जुन पाचे (वय ५२) याचा मृतदेह मोकळ ओहोळ येथील कदम यांच्या विहिरीत गुरुवारी आढळला.
काॅन्स्टेबल शैलेश सरोदे, सुशांत दिवटे, रोहित पालवे यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
दुपारी वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. नातेवाईकांचा शोध पोलिस घेत आहेत.
वीस वर्षांपूर्वी अर्जुन पाचे हा शेतमजूर एकटाच मोकळ ओहोळ परिसरात कामानिमित्त आला होता. तो पैठण, उचेगाव येथील रहिवासी असल्याचे सांगत असे.