अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-राहुरी खुर्द येथील २२ वर्षीय तरुणाचा निंबळक परिसरातील रेल्वे रुळालगत कोणीतरी डोक्यावर अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याची घटना घडली आहे.
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथिल रवींद्र भाऊसाहेब चव्हाण वय २२ हा तरुण चोलामंडळ फायनान्स मध्ये काम करत होता. तो काल सकाळ पासुन कामा निमित्ताने बाहेर गेला होता.
सायंकाळी घरी न आल्याने सर्व नातेवाईकांनी शोधा शोध केली असता त्याची दुचाकी वांबोरी फाटा तेथे मिळुन आली व त्याचा मृतदेह दुचाकी सापडल्या पासुन १० ते १५ किलो मीटर अंतरावरील निंबळक परिसरातील रेल्वे रुळा लगत मिळून आला.
सुरवातीस पोलिसांनी सदर मृतदेह हा रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच नातेवाईकांनी हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सदर घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रवींद्रच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीत नातेवाईकांना काही रक्कम मिळुन आल्याचे बोलले जात आहे.
रवींद्र याची हत्या नेमके कोणत्या कारणातुन झाली ? त्याची कोणाशी काही वैर होते का? त्याचे कोणाशी काही वाद झाले होते का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.