राहुरी: आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा व ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला आपला पाठिंबा होता. राज्यातील पुन्हा भाजप आघाडीचे सरकार येणार आहे.
मात्र, आम्हाला सोबत घेऊन, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कंेद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देवळाली प्रवरा येथे आरपीआय मेळाव्यात केले. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात रिपाइंकडून निवडणूक अनेक लढण्यास इच्छुक आहेत.
मात्र, सुरेंद्र थोरात यांचे वडील स्वर्गीय बबनराव थोरात पहिल्यापासून आमच्याबरोबर राहिले आहे. सुरेंद्रदेखील आज जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहेत, असेही आठवले यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी रिपाइंचे सचिव श्रीकांत भालेराव होते.
यावेळी म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, रिपाइंचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामदास आठवले, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, राजाभाऊ अहिरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे काकासाहेब खंबाळकर, दीपक गायकवाड, श्रावण वाघमारे, श्याम गोसावी, जिल्हाप्रमुख सुनील साळवे आदी उपस्थित होते.