मतदार संघातील आपल्या संर्वांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावरच कर्जत-जामखेड मतदार संघाला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आणि मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यासह कर्जत-जामखेडकरांची इमाने-इतबारे सेवा केली.
केवळ वैयक्तिक संस्था, कारखाने न काढता संपूर्ण मतदार संघालाच परिवार मानून आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकासाचा अनुशेष मोठ्याप्रमाणावर भरून काढण्यात यशस्वी झालो.
कधीकाळी विरोधात असलेले विरोधक देखील आज सोबत आहे हे केवळ अडवुणुकीचे, हेव्या-दाव्याचे राजकारण न करता लोक जोडण्याचे केलेले समाजकारण आणि यामुळेच मतदारसंघात कुणीही विरोधक नाही असे प्रतिपादन पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांनी केले.
काल रात्री उशिरा वंजारवाडी ता.जामखेड येथे तांडा वस्ती योजनेअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मा.मंत्री महोदयांनी वंजारवाडी येथील भगवान बाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी भूमीपूजनास भाजपा अध्यक्ष श्री.रवी सुरवसे, श्री.प्रवीण सानप, श्री.चत्रभून बोलभट, बाजार समितीचे संचालक श्री.पृथ्वीराज वाळुंजकर, श्री.महेश काळे, श्री.केशव वणवे, श्री.गणेश लटके, श्री.बांगर साहेब, श्री.शिवाजी कुटे, श्री.पोपट मुंडे, श्री.वसंत सानप, श्री.नवनाथ जावळे, श्री.भारत सानप, श्री.शिवाजी सांगळे, श्री.दत्तात्रय ढाळे, श्री.ज्ञानेश्वर सानप, श्री.भगवान सानप, श्री.प्रकाश ढाळे, श्री.निलेश ढाळे, श्री.बापू ढाळे, श्री.विलास ढाळे, श्री.राजाभाऊ ढाळे, श्री.रामा खोत, श्री.प्रल्हाद सांगळे, श्री.राजकुमार सानप, श्री.चौधरी तसेच वंजारवाडी व पंचक्रोशीतील मान्यवर, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.