अल्पवयीन मुलीचा आंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून ब्लॅकमेल करत तब्बल ९ महीने बलात्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अंघोळ करताना मोबाईलवर व्हीडीओ तयार करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तार वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचे मोबाईल मध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले आणि ते व्हिडीओ सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देऊन मागील नऊ महिन्यांपासून त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुलीने काल रात्री दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा आरोपी रामदास मोरे याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो,बलात्कार,विनयभंग अश्या विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुलं असल्याची माहिती समजली असून या नराधमाने आंघोळीचा व्हिडीओ सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत मागील नऊ महिन्यापासून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करत होता

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24