राहुरी :- तालुक्यातील बारागाव नांदूर येथे दोन वर्षांपूर्वी एकाने मुलीचे राहत्या घरातून अपहरण करीत ‘तुझ्यासह तुझ्या वडिलांना जिवे मारून टाकू’,
अशी धमकी देत अत्याचार केल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
राहुरी पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मुजफ्फर लतिफ पटेल याने सुमारे दोन वर्षांपूर्वी तरुणीला तिच्या वडिलांच्या राहत्या घरातून पळवून आणले.
चुलतीच्या घरात तिला ठेवले असता चुलतीने तरुणीला ‘तू मुजफ्फर सोबत लग्न कर, मुस्लिम धर्माचा स्विकार कर, नाहीतर तुझ्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देऊ.
तसेच तुझ्या वडिलांना गावठी कट्ट्याने मारून टाकू’, अशी धमकी दिली. तसेच पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
राहुरी पोलिसांनी संबंधित गुन्ह्याबाबत आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती समजली आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच राहुरीत खळबळ उडाली आहे.