शरीर संबंधास नकार करताच द्यायचा जीवे मारण्याची धमकी,लग्नाचे आमिष दाखवून वर्षापासून अत्याचार, करणाऱ्या आरोपीस अखेर अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : नगर शहरात सावेडीतील वैदवाडी परिसरातील एका स्त्रीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रोहन आल्हाट यास अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित महिला व आरोपी आल्हाट या दोघांची ओळख होती. तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत आल्हाट याने वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

दारू पिवून तो तिला मारहाणही करत. शरीर संबंधास नकार दिला तर जीवे ठार मारू अशी धमकी तो देत असत. त्याच्या जाचाला कंटाळून अखेर तिने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.

दरम्यान पोलिसांनी आरोपी रोहन आल्हाट यास गुन्हा दाखल होताच ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24