अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका नराधमाणे एका 19 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येळपणे येथील धनंजय गायकवाड या नराधमाने एका 19 वर्षीय तरूणाला लग्नाचे आमिष दाखवून
पळवून नेऊन कारेगाव येथे खोली भाड्याने घेऊन त्या तरूणीवर तिची इच्छा नसताना कोरेगाव तसेच येळपणे या ठिकाणी अनेकदा अत्याचार केला.
याप्रकरणी पीडित तरूणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.