शिर्डी संस्थानच्या सीईओपदी पुन्हा कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची काही दिवसांपूर्वी मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली होती.

त्यांची हि बदली रद्द करण्यात आली असून शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कान्हुराज बगाटे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बदली झाल्यानंतरही बगाटे शिर्डीतच कार्यरत होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली त्यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा शिर्डीला नियुक्ती देण्यात आली आहे. राज्यातील आठ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश सरकारने काढला आहे.

त्यामध्ये बगाटे यांचा समावेश आहे. आयएएस नसताना नियुक्ती झाल्याचा वाद उपस्थित झाल्यावर सरकारने त्यांची बदली मुंबईला केली होती.

मात्र, त्यांच्या जागी शिर्डीला कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. आता पुन्हा त्यांची या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली असून भारतीय प्रशासन सेवेत बढती मिळाल्यानंतर रिक्त पदावर नियुक्ती देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24