पुन्हा वाढले कोरोना रुग्ण,संगमनेरकरांमध्ये उडाली खळबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण येथे २, पिंपरणे, साकूर, हुसेननगर आणि लखमीपुर येथील प्रत्येकी १ अशा सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.

त्यामुळे संगमनेरमधील बाधितांचा आकडा १०६ झाला आहे. शनिवारी नो पॉझिटिव्ह अहवाल आल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले. मात्र, रविवारी तो दिवस भरून काढला.

सकाळीच तालुक्यातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. हे रुग्ण नव्याने आढळून आल्याने संगमनेरकरांमध्ये खळबळ उडाली.

कुरण येथे ३५ व ६३ वर्षीय पुरुषांना बाधा झाली. तेथील आकडा तीनवर गेला. पिंपरणे येथे ३५ वर्षीय पुरुष, साकूर येथे ४८ वर्षीय पुरुष व शहरातील हुसेननगर येथील ७० वर्षीय महिला हे नव्याने बाधित झाले.

कंटेन्मेंट भागातील लखमीपुरा येथील ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शहरातील उपनगरे, नाशिक-पुणे महामार्ग व अकोले राज्यमार्गावर गर्दी होण्याच्या ठिकाणाचा भाजीपाला बाजार हटवला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24