के.के.रेंज सराव क्षेत्राबाबत महत्वाचे अपडेट वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-युध्‍दाभ्‍यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना अधिनियम 1938 याच्‍या कलम 9 च्‍या पोट कलम (1) व (2) नुसार प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये के.के. रेंज अहमदनगर लष्कराच्या गोळीबार क्षेत्रालगतचे क्षेत्रदिनांक 15 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत जिवंत दारूगोळ्यासहीत मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी अधिसूचना क्षेत्र म्‍हणुन घोषित करण्‍यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

अर्थात, ही ठिकाणे ही वेगवेगळ्या दिवसांकरिता वेगवेगळी लक्ष्‍ये साध्‍यासाठी प्रशिक्षणातील विविधता आणि त्‍याचबरोबर एखादे विशिष्‍ट गाव किंवा गावाच्‍या समुहाचे संपूर्ण विनिर्दिष्‍ट कालावधीत सततचे स्‍थलांतर टाळण्‍यासाठी निवडण्‍यात आली आहेत. विनिर्दिष्‍ट क्षेत्रातील फक्‍त अशीच गावे आणि धोकादायक क्षेत्र म्‍हणुन असलेली क्षेत्रे हे सरावासाठी आवश्‍यक दिवशीच महसुल अधिका-यांमार्फत धोकादायक क्षेत्र म्‍हणुन विहित नोटिस देऊन खाली करण्‍यात येतील.

कोणत्‍याही परिस्थितीत विनिर्दिष्‍ट क्षेत्रातील सर्व गावांबाबत वरील संपूर्ण कालावधी दरम्‍यान स्‍थलांतराची कारवाई केली जाणार नाही, असे यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. या जाहीर नोटीसीनुसारअधिसुचित क्षेत्राचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे.

अहमदनगर तालु्क्यातील देहेरे गावातील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 181.78 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 94.73. इस्‍लामपुर गावातील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 31.39 सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 2.12 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 18.38. शिंगवे गावातील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 118.25 सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 9.47. नांदगाव गावातील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 385.22 सरकारी जमीन

एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 98.55. सुजलपूर गावातील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 200.23 सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 40.71. घाणेगाव गावातील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 74.40 असे एकुण अहमदनगर तालुक्‍यामधील गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 991.27, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 150.85 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 113.11. राहुरी तालुक्‍यामधील बाभुळगाव गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 304.40 सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 33.79 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 81.03. जांभुळबन गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 117.42 सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 564.81 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 6.30. जांभळी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 567.24 सरकारी जमीन एकुण क्षेत्र(हेक्‍टर) 435.19 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 1063.79.

वरवंडी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 260.37, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 63.63 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 167.89. बारागांव नांदुर गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 104.19, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 282.73 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 1555.68. कुरणवाडी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 141.30, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 216.53. घोरपडवाडी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 94.45, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 6.27. चिंचले गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 1358.35, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 51.99 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 465.25. गडाखवाडी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 166.63, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 8.19. तहाराबाद गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र(हेक्‍टर) 5.24.

दरडगांवथडी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 154.57, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 415.87 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 638.14. वावरथ गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 856.48, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 181.52 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 1679.68 असे एकुण राहुरी तालुक्‍यामधील गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 4130.64, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 2260.52 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 5657.76. पारनेर तालुक्‍यामधील वनकुटे गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 1024.87, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 502.15 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 2831.42 आणि 12.82. पळशी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 487.79, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 68.79. वडगाव सावताळ गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 187.36 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 674.21.

गाजदीपुर गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 351.51, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 54.11 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 1934.30. ढवळपुरी गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 3625.52, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 560.6. असे एकुण पारनेर तालुक्‍यामधील गावांतील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 5677.05, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 1185.74 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 5452.75.अशाप्रकारे, अहमदनगर जिल्‍ह्यामधील खाजगी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर)10798.96, सरकारी जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर) 3597.11 आणि वन जमीन एकुण क्षेत्र (हेक्‍टर)11223.62 इतके आहे.

सदर सविस्‍तर तपशिलवार अधिसुचना तसेच युध्‍दाभ्‍यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना अधिनियम कायद्यातील तरतुदी अहमदनगर जिल्‍ह्याच्‍या ahmednagar.nic.in या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच वरील गावांमधील समाविष्‍ठ असलेले सर्व्‍हे नंबर, गट नंबर आणि फॉरेस्‍ट कंपार्टमेंट नंबर निहाय यादी संबंधित तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालयात देखील प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24