अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे पोहायला गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर असे की उत्तर प्रदेशातील मजूर आपल्या कुटुंबासह बाबुर्डी येथे एका गुर्हाळावर काम करत असून त्यातील एका कुटुंबातील मुले आपल्या आई, वडिलांना न कळविता शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेले .
शेत तळ्यात उतरताना त्यांनी ठिबकच्या पाईपचा घेतला होता. मात्र तो पाईप मुलांच्या ओझ्याने तुटल्याने मुले पाण्यात पडले. त्यावेळी त्यांना पोहता न आल्याने त्या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 ते 3 कुटुंब या ठिकाणी गुर्हाळावर काम करतात.
कोरोना विषाणू काळात त्यांनी घरी न जाता, येथेच थांबणे पसंत केले मात्र त्या कुटुंबातील मुलांच्या झालेल्या मृत्यु मुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
स्थानिकांच्या मदतीने या चारही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews