अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- देशासह जिल्हयात देखील बर्ड फ्ल्यू चे संकट आले असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे अनके कोंबड्या मृत पावल्या होत्या, यामुळे नगरकरांची धाकधूक वाढली होती. मात्र मिडसांगवी येथे मृत आढळलेल्या कोंबड्याचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मात्र, श्रीगोंदा शहर आणि तालुका, जामखेड आणि नगर तालुक्यात मृत आढळलेल्या कावळे, कबतूर आणि सांळुकी यापैकी एका पक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पशूसंवर्धन विभाग सावध झाले होते. दरम्यान पाथर्डी आणि नगर तालुक्यात 70 कोंबड्या मृत पावल्या होत्या.
तर श्रीगोंदा शहर आणि जामखेड तालुका आणि नगर तालुक्यात कावळे, कबूतर आणि साळुंकी मृत अवस्थत आढळले होते.
या सर्वांचे नमुने पुण्याच्या औंधमधील पश्चिम विभाग रोग अन्वषण प्रयोग शाळा, पशूसंवर्धन आयुक्त या ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
यात कोंबड्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून अन्य पक्षांपैकी एकच्या अहवालात एच प्रोटिन्स पॉझिटीव्ह आल्याने हे सर्व नमुने आता एन प्रोटिन्सच्या तपासणीसाठी भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.
त्याचा अहवाल आज जिल्हा पशूसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर कोणत्या भागातील पक्षी बर्ड फ्ल्यूचा शिकार झाला हे स्पष्ट होणार आहे.