अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अवघ्या 24 तासात आज कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत, यात नगर शहरातील 15 रुग्णांचा समावेश असून इतर पाच रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत.
आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये तोफखाना येथील ७, नालेगाव वाघ गल्ली १, सिद्धार्थनगर येथील ४, दिल्लीगेट २ आणि बालिकाश्रम रोडवरील १ यांचा समावेश आहे.याशिवाय संगमनेर ३, जामखेड येथील १ व श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
यामध्ये तोफखाना येथील ८० वर्षीय आणि ५९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष २ वर्षाचा मुलगा, २२ वर्षीय तरुणाचा तसेच ४६ वर्षीय व ९० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
नालेगाव येथील २२ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच सिद्धार्थनगर येथे ८ वर्षीय मुलगी, ३० वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे.
दिल्लीगेट येथील १३ वर्षीय मुलगा, ३३ वर्षीय महिला, बालिकाश्रम रोडवरील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या शिवाय संगमनेर येथील ३ पुरुष, जामखेड येथील १ पुरुष व श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रातीला हा आकडा सर्वात मोठा असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३२४ झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
Web Tital – Record-breaking increase in corona patients in Ahmednagar: 20 patients found in a single day!