अहमदनगर जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण गेले घरी एकाच दिवसात बरे झाले ‘इतके’ रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २७ हजार ७१३ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७९० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ८०२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८६१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०६२ आणि अँटीजेन चाचणीत १८६७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११०, अकोले १५१, जामखेड २५, कर्जत ८५, कोपरगाव २४, नगर ग्रामीण १५, नेवासा ०१, पारनेर ६२, पाथर्डी १५, राहता ४३, राहुरी ३९, संगमनेर ७६, शेवगाव ७८, श्रीगोंदा ३१, श्रीरामपूर ०३, कॅंटोन्मेंट बोर्ड ९० आणि मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२६, अकोले १९, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ६४, नगर ग्रामीण ८७, नेवासा २१, पारनेर १८, पाथर्डी ०७, राहाता १०७, राहुरी ३८, संगमनेर ७०, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ७४, कॅंटोन्मेंट बोर्ड २२ आणि इतर जिल्हा ८९ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १८६७ जण बाधित आढळुन आले. मनपा ३५१, अकोले ६३, जामखेड २४, कर्जत २०६, कोपरगाव ५८, नगर ग्रामीण २४०, नेवासा ९८, पारनेर ७६, पाथर्डी ८५, राहाता १५२, राहुरी १३९, संगमनेर ७१, शेवगाव ३९ श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर १२३, कॅन्टोन्मेंट बोर्ड ५४ आणि इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७१८, अकोले ११३, जामखेड ४६, कर्जत १९९, कोपरगाव १६६, नगर ग्रामीण २७१, नेवासा १५१, पारनेर १२६, पाथर्डी १४१, राहाता २८४, राहुरी १३६, संगमनेर १६७, शेवगाव १४९, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर १७७, कॅन्टोन्मेंट ९० आणि इतर जिल्हा २८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,२७,७१३
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२२८०२
  • मृत्यू:१७२१
  • एकूण रूग्ण संख्या:१,५२,२३६
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24