अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील के.के.रेंज हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. गावकऱ्यांपासून ते राजकीय मंडळींपर्यंत सर्वानी याविषयामध्ये हात घातला आहे.
दरम्यान नगर जिल्हयातील पारनेर, नगर व राहुुरी तालुक्यातील जमीनी यापूर्वीच के के रेंज साठी लष्कराने ताब्यात घेतलेल्या आहेत. मुळा तसेच काळू धरण, कृषी विदयापिठासाठी करण्यात आलेल्या जमिनीच्या अधिग्रहनामुळे शेतकरी विस्थापीत झालेले आहेत,
असे असताना त्याच भागातील जमिनी के के रेंजच्या विस्तारासाठी अधिग्रहीत करणे योग्य नाही असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नावर पुढील आठवडयात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेणार असल्याचे बुधवारी मुंबई सांगितले.
के के रेंजच्या विस्तारासाठी तीनही तालुक्यातील जमीनीचे हस्तांतर करण्यासाठी लष्काराकडून हालचाली सुरू झाल्या असून त्या भागातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
या प्रश्नी शरद पवार यांनी हस्तक्षेप करावा यासाठी बुधवारी आ.लंके यांनी मुंबईत पवारांची भेट घेउन के के रेंजचे गा-हाणे मांडले.
त्यावर पवार यांनी या प्रकल्पाच्या विस्तारास आपला पहिल्यापासून विरोध होता, यापुढेही राहिल असे स्पष्टपणे सांगितले.
तसेच भुसंपादन झाल्यामुळे येथील नागरीक पूर्वीच विस्थापित झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आपण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत.
पुढील आठवडयात लोकसभेच्या अधिवेशन काळात संरक्षण मंत्र्यांच्या भेटीची वेळ ठरविण्यात येईल. या बैठकीसाठी आ. लंके यांनाही उपस्थित राहण्याचे खा. पवार यांनी सुचविले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved