के के रेंज बाबत खासदार डॉ. सुजय विखेंनी घेतला हा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  के के रेंज मधील अधिग्रहित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांना त्यांची भरपाईची रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मुंबई व पुणे येथील भूखंड दिले होते.

मात्र, या भूखंडाची राज्य शासनाने विक्री करून त्यातून मिळालेल्या रक्कमेची इतर कामांसाठीच विल्हेवाट लावली, त्यामुळे के.के.रेंजबाबत राज्य शासन घेत असलेली दुटप्पी भूमिका.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील उद्या (रविवारी )जनतेसमोर मांडणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहके.के. रेंजच्या प्रश्नासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व लष्करप्रमुखांची भेट झाल्यानंतर संरक्षणमंत्री व व लष्करप्रमुख काय म्हणाले ?

याबाबत के.के. रेंज परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये कुतूहल आहे. यासंदर्भात या भागातील जनतेला माहिती देण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील हे उद्या ( रविवारी )पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ व गाजीपुर या गावांना भेट देऊन लष्कराची भूमिका जनतेसमोर मांडणार आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24