अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. बोठेच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आलेली आहे.
दरम्यान बोठेचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. नुकतेच पोलीस पथकाने आरोप बोठे याच्या घराची झडती घेतली आहे. या झडती दरम्यान पोलिसांना बोठेचा मोबाईल सापडला आहे.
लॉक असलेल्या या मोबाईल अनलॉक करण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहे. त्या मोबाईलमधील डाटा करफ्ट होऊ नये, म्हणून पोलीस तांत्रिक तज्ञांची मदत घेत आहेत. हा मोबाईल या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण पुरावे देणारा आहे.
परंतु, बोठे याचा मोबाईल उच्च कंपनीचा आहे. या मोबाईलला दोन सिक्युरिटी लॉक आहेत. हे लॉक सामान्य खोलण्याचा प्रयत्न केल्यास त्यातील डाटा आपोआप करफ्ट होण्याची भीती आहे.
मोबाईलमधील डाटा करफ्ट होऊ नये, यासाठी पोलिसांनी सावधपणे कार्यवाही सुरू केली आहे. मोबाईलचा लॉक खोलण्यासाठी पोलीस तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, हा गुन्हा तांत्रिक पुराव्यावर उभा असून पोलिसांनी सर्व तांत्रिक पुरावे न्यायालयात दिले आहेत. यामुळे न्यायालयाने बोठे याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.