अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मास्टर माईंड बाळ ज. बोठे अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश आले नसले तरी महत्वाची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे.
पोलिसांनी ती जप्त केली असून, त्या डायरीत जरे हत्याकांड प्रकरणातील महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ही डायरी रेखा जरे यांच्या घरातून जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान या डायरीत महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडल्याने बाळ ज. बोठे याच्या अडचणीत आता आणखीनच भर पडली आहे. ३० नोव्हेंबर २०२० रोजी रेखा जरे यांची नगर-पुणे रोडवरील जातेगाव घाटात निघृर्ण हत्या करण्यात आली.
या हत्याकांडातील मास्टरमाईंड बाळ ज. बोठे पोलिसांना सतत गुंगारा देत आहे. त्याला अटक करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असली तरी तो अद्यापही फरारीच आहे.
बोठे याने नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. तो अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. बोठे याच्या बालिकाश्रम रोडवरील जिद्द या बंगल्याची पोलिसांनी तिनदा झाडाझडती घेतली.
बंगल्याच्या झाडाझडतीत महत्वाची कागदपत्रे व बोठे याच्याकडील परवाना रिव्हलवर जप्त करण्यात आला आहे. बोठे याला गजाआड करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही.
रेखा जरे हत्याकांडाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी नुकताच कॅंडल मार्च काढून निषेध नोंदविला होता. हत्याकांडातील मास्टर माईंड बाळ ज. बोठेला अटक न करण्यात आल्याने हत्याकांडाचे रहस्य अद्यापही उलगडले नाही.