अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपासा दरम्यान दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या आरोपींमध्ये फिरोज राजू शेख (रा. संक्रापूर, आंबी, राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (राहणार कडीत फत्तेबाद, श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (राहणार तिसगाव फाटा, कोल्हार, राहाता) यांचा समावेश आहे.
त्यांना पारनेर न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तीन आरोपींना अटक केल्यानंतर जरे खुनाच्या घटनेचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. या प्रकरणात अजून अन्य नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, मात्र, पोलिसांनी आरोपींची नावे अधिकृतपणे सांगितलेली नाहीत.
पारनेर न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. मनीषा डुबे यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़. पोलीस तपासात या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे़.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved