रेखा जरे हत्याकांड : साक्षीदार विजयमाला माने म्हणतात,स्वास्थ ढासळले माझ्या जीवाला धोका…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या व त्यांच्या कार मध्ये असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्ष साक्षीदार विजयमाला माने यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.त्यांनी आज पोलिसांत जबाबसाठी हजेरी लावली.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. घटना कशी घडली, हे देखिल सांगीतले. मात्र आपल्या जीवीताला धोका असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.

जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे फरार झाल्यानंतर विजयमाला माने ह्या सुद्धा फरार झाल्याच्या बातम्या व चर्चा सुरु झाली होती मात्र आपण कुठेही पसार नव्हतो.

सतत येणार्‍या फोनमुळे आपले स्वास्थ ढासळले होते. म्हणून संपर्कात नव्हतो, असे त्यांनी सांगीतले आहे. दरम्यान रेखा जरे यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे.

विशेष म्हणजे, जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर माने यांनी स्वत: कार चालवून जरे यांना दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24