मोटरसायकल ट्रॅक्‍टरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू नातेवाईकांचा आहे ‘हा’ आरोप !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : अहमदनगर : राहुरी येथे मोटरसायकल आणि ट्रॅक्‍टर यांच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंकज जाधव या तरुणाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत.

म्हणून त्याला जीव गमवावा लागला, दुसरा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात हलविले आहे.

राहुरी येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरात (दि. ९) रोजी सकाळी मोटरसायकलवर पंकज चांगदेव जाधव व सुरज गणपत आढाव हे दोघे राहुरीकडे येत होते. यावेळी रेल्वे स्टेशन रोड परिसरात त्यांच्या मोटार सायकलचा आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.

या अपघातात पंकज आणि सुरज या दोन्ही तरूणांना जबर मार लागला. नागरिकांनी जखमी झालेल्या दोघांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र पंकज जाधव या तरुणाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. म्हणून त्याला जीव गमवावा लागला, असा आरोप पप्पू कल्हापूरे यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24