श्रीगोंदा तालुक्यातील ‘त्या’ व्यक्तीचा अहवाल आला, वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  बारामती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आले असल्याची माहिती दि.२९ मार्च रोजी समोर आल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नगर येथे पाठविल्या नंतर

आज दि.२ एप्रिल रोजी त्या तीन जणांचे कोरोना तपासणी अहवाल मिळाले असून तिघेही कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

२० मार्च रोजी श्रीगोंदा तालुक्यातील या तीनही व्यक्ती शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बारामती येथील ‘या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती दि.२९ मार्च रोजी समोर आल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविल्याने श्रीगोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

त्या तिनही रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल आज दि.२ एप्रिल रोजी मिळाले असून तिघेही कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24