अहमदनगर Live24 :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी ५६ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
यात, नेवासा येथील २४, श्रीरामपूर येथील ११, नगर शहर ०६, राहता ०३, पाथर्डी तालुक्यातील ०२, राहुरी ०२, कोपरगाव येथील ०४ तर अकोले, संगमनेर, कर्जत येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत,
कोरोना बाधीत फ्रान्स येथील परदेशी नागरिकाचा १४ दिवसा नंतरचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®