अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- आपण कोरोना बाधीत असल्याबाबत काही ठिकाणी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आणि कोणतीही खातरजमा न करता केलेले कृत्य आहे.
याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून न घेता एकतर्फी आणि चुकीच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमाातून प्रसारित केल्या.
त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या गोष्टीवर अथवा अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये,’ असे स्पष्टीकरण डॉ. प्रदीपकुमार मुरांबिकर यांनी दिले आहे.
नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनीही आज सायंकाळ पर्यंत असा कोणताही अहवाल आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन अशा प्रकारे माहिती प्रसारित करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com