अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील 143 पैकी राहिलेल्या 9 ग्रामपंचायतींचे सरपंच पदासाठी आरक्षित जागेच्या प्रवर्गातील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने सरपंच पद रिक्त राहिलेले होते.
त्यावर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये सरपंच पदाचे आरक्षण नेमून देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आल्याने या 9 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी प्रांत कार्यालयाच्या सभागृहात उर्वरीत ग्रामपंचायतीचे सर्व आजी-माजी सदस्य, सरपंच, सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली फेर आरक्षण सोडत बैठक आयोजित करण्यात आली होती.
असे असणार आरक्षण शिंदोडी-अनुसूचित जाती व्यक्ती, जवळेकडलग-अनुसूचित जमाती व्यक्ती, सोनेवाडी-अनुसूचित जमाती व्यक्ती, खळी- अनुसूचित जाती व्यक्ती, मिरपूर- अनुसूचित जमाती (आरक्षण कायम),
चिखली- अनुसूचित जमाती व्यक्ती, सावरगाव घुले-अनुसूचित जाती व्यक्ती, वेल्हाळे-अनुसूचित जाती व्यक्ती, पारेगाव खुर्द-अनुसूचित जमाती व्यक्ती या प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.