अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला : जिल्ह्यातील त्या बहुचर्चित हत्यांकांडाचा बदला…. भरदिवसा माजी सरपंचाची हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे,पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची निघृण हत्या झाली आहे,

त्यांच्यावर भरदिवसा शेतातच प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि राजाराम शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. 

उपचारापूर्वीच निधन :- धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली.

त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

अकरा वर्षापुर्वीची ‘ति’ हत्या…

१३ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे-नगर रोडवरून नारायणगव्हाण शिवारातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळ्या झाडून कांडेकरांची हत्या केली. या हत्येमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. 

कांडेकरांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांच्या डोक्यातील गोळी गायब करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोक रजपूत यांनी १४ आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. 

कांडेकर खून प्रकरणात आरोपी :- राजाराम शेळके हे दहा वर्षापूर्वी नारायाणगव्हाणचे माजी सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होते. 

त्यांच्यासह कांडेकर खून प्रकरणात आणखी काही आरोपी होते. राजाराम शेळके आणि त्यांच्या मुलाला या गुन्ह्यात शिक्षा लागली होती. 

शेतात काम सुरु असतानाच हल्ला :- राजाराम शेळके यांना कोरोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. 

पॅरोलची रजा उपभोगत असताना त्यांनी गावातील शेतात काम चालू केले होते आणि हे काम चालू असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24