जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2020-21 चे आयोजन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विदयमाने सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात दि. 23 डिसेंबर 2020 या कालावधीत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता आनलाईन पध्दतीने जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे आयोजन 15 ते 29 या वयोगटातील युवक युवतींकरीता सांघिक व वैयक्तीक प्रकारांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सांधिक प्रकारामध्ये लोकनृत्य, लोकगीत व वैयक्तीक प्रकारांमध्ये एकांकीका (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी/कनार्टकी), शास्त्रीय नृत्य,

सितार, बासरी,तबला, वीणा, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गिटार, मणिपुरी नृत्य, ओडिसी नृत्य, भरतनाटयम, कथ्थक,कुचिपुडी नृत्य, वक्तृत्व यांचा समावेश आहे. तरी जिल्हयातील शाळा,महाविदयालय, संगीत अॅकॅडमी,नृत्य अॅकॅडमी, युवक मंडळे, कला मंडळे यांनी यामध्ये सहभागी व्हावे.

आपला सहभाग नोंदविण्याकरीता आपली प्रवेशिका ज्यामध्ये शाळा/महाविदयालय/संस्थेचे नाव, स्पर्धकाचे नाव, जन्मतारीख व वय…. आदी बाबी मराठीमध्येन नमुद करुन dsoahmednagaro1@gamil.com या मेलवर दि. 22/12/2020 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत पाठवाव्यात.

स्पर्धा googlemeet वर आयोजित करण्यात येईल. Meet ची link व वेळ दि. 22/12/2020 रोजी सायं. 6.00 वा. पाठविण्यात येईल तसेच अधिक माहितीकरीता क्रीडा अधिकारी दिपाली बोडके यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24