राज्यमंत्र्यांच्या शहरातच पथदिवे बंद, नागरिक संतापले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :  राहुरीला ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्रिपद मिळाले असताना राहुरीच्या जनतेवर अंधारात चाचपडत मार्ग काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरातील आमदार चारीजवळील पथदिवे व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

नगर-मनमाड राज्यमार्गालगत मल्हारवाडी दिशेला असलेल्या आमदार चारीजवळील रस्त्यावर पहाटे व सायंकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

आमदार चारीजवळ जाॅगिंग ट्रॅक तयार करण्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या कामासाठी निधीदेखील उपलब्ध झाल्याचे नगरसेवकांचे तोंडी म्हणणे आहे.

मात्र, हा संकल्प अद्याप पूर्ण झाला नसताना जागोजागी खड्डे पडलेला रस्ता, तसेच गेल्या पंधरवड्यापासून पथदिवे बंद पडल्याने नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभार चव्हाट्यावर आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24