अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : एका विधवा महिलेच्या जमिनीत शेजारील लोकांनी रस्ता बंद करून शेतातील बांध कोरल्याची विचारणा केल्यावरून या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
या महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.नेवासा तालुकयातील गिडेगाव येथील विधवा महिला मथुराबाई जॉन गायकवाड यांची गट क्रमांक ४७ मध्ये त्यांची व दिराची वडिलोपार्जित जमीन असून ही महिला येथे रहाते.
त्यांचा दीर मुंबई येथे नोकरीसाठी असंताना ते गावी येऊन शेती करीत. ते शेतीची मशागत करण्यासाठी गेले असता शेजारी सुखदेव शंकर गायकवाड,
इंदूबाई सुखदेव गायकवाड, हिराबाई अशोक गायकवाड, मनोहरअशोक गायकवाड व भाऊसाहेब अशोक गायकवाड यांनी शेतीचा बांध कोरल्याची विचारणा केली असता, मला व दीराला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews