रशियाची कोरोनावरील उत्पादित झालेली लस भारतातही तयार होणार?; तज्ज्ञ म्हणतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जगभरातील कोरोनाच्या थैमानामुळे जगाचे लक्ष लशी कडे लागले आहे. अनेक देशांनी आपली लस अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे.

परंतु रशियाने मात्र जगातील पहिली कोरोना लस तयार केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं.

आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. परंतु ही रशियन लस भारतातही दिली जाणार का? असा प्रश्न देशभरातील नागररिकांच्या मनात उभा राहिला आहे.

कोरोनाची लस स्तुतनिक व्हीमध्ये आता भारतीय कंन्यांनीही स्वारस्य घेतलं आहे. भारतीय कंपन्यांनी रशियाच्या या लशीचं उत्पादन करण्यासाठी उत्साह दाखवला आहे.

पहिल्या दोन चाचणीच्या टप्प्यातील माहिती रशियन डायरेक्टर इंवेस्टमेंट फंड RDIF ने भारतीय कंपन्यांना द्यावी अशा मागणी करण्यात आली आहे.

भारतीय कंपन्या यासंदर्भात RDIF शी संपर्कात आहेत. सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. लशीच्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निकाल या कंपन्यांनी मागितले आहेत.

RDIF या कंपनीनं कोरोनाच्या लशीच्या संशोधनासाठी भांडवल दिलं होतं. ही लस निर्यात आणि घुरगुती वापरासाठी वापरण्यात येऊ शकते असंही रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे.

RDIF सोबत भारतीय कंपन्यांची चर्चा यशस्वी झाली तर येत्या काही काळात ही लस भारतात तयार केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीच या लशीच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. रशियाने कोरोना लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल केलेलं नाही.

कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल न करताच त्याच्या उत्पादनासाठी परवाना दिला जात असेल तर हे धोकादायक ठरू शकतं, असं WHO ने म्हटलं आहे.

रशियाच्या पुतीन सरकारने दावा केला आहे की त्यांनी जगातील पहिली कोरोना लस तयार केली आहे. ही लस रशियन संरक्षण मंत्रालय आणि गामालेया नेशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन एपिडिमियोलॉजी एंड माइक्रोबायलॉजी यांनी विकसित केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24