सचिन जगताप याची गळफास घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर दशरथवाडी येथील सचिन अशोक जगताप (वय ४०) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वडील अशोक सोपान जगताप (वय ६३) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब सकाळी उठल्यावर घरच्यांच्या लक्षात आली. आत्महत्येचे कारण समजले नाही. या घटनेचा तपास पोलिस नाईक आर. ए. एम. दारकुंडे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24