अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डीचे साई मंदिर या जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं.
मात्र ‘साई समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही’, असा खुलासा साई संस्थानतर्फे करण्यात आला आहे.
उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका व्हिडीओद्वारे ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेअंती साईबाबा समाधी मंदिर उघडणे बाबत निर्णय घेतला जाईल, असं ठाकरे स्पष्ट केलं आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews