अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- सध्या राज्यात कोणेतेही भारनियमनची अंमलबजावणी नाही आहे. तरी देखील साईबाबांच्या शिर्डी मध्ये तब्बल 30 तास वीजगूल झाली होती. यामुळे शिर्डीकर चांगलेच हैराण झाले होते.
साईसंस्थानसह लॉज व हॉटेल व्यवसायामुळे येथून विजवितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे खास बाब म्हणून कोपरगाव येथून स्वतंत्र व्यवस्था करून शिर्डीसाठी चोवीस तास विजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र 33 के.व्ही.च्या दाबाने येणा-या विजवाहक तारांवर परवा (ता.20) सायंकाळी सहाच्या सुमारास वादळामुळे निमगाव परिसरात झाडाची मोठी फांदी मोडून पडली. त्यामुळे विजेचे पाच सहा खांब वाकले.
शहराचा विजपूरवठा खंडीत झाला. काल रात्री बारा वाजेपर्यत संपूर्ण शहर पाणी आणि विजेवाचून हैराण झाले होते. मध्यरात्री नंतर शहरात विज आली,
पून्हा लखलखाट झाला, दरम्यान तब्बल 30 तासाच्या कालखंडानंतर शिर्डीकरांना विजेचे दर्शन झाले. सलग बारा तास दुरूस्तीचे काम करूनही अडचण दुर होईना.
शेवटी निमगाव येथून शिर्डी शहरासाठी विजपूरवठा सुरू केला. पुढील दोन ते तिन दिवसात शहराचा विजपुरवठा सुरळीत ठेऊन या संपूर्ण विज वाहक मार्गीवरील दुरूस्तीचे काम पूर्ण केले जाईल. असे आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved