संगमनेर | पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अनधिकृत वाळूसाठे अधिकृत दाखवत सादर केलेल्या बनावट वाळू वाहतूक पासांचे पुरावे देऊनही ठेकेदार कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी गणेश धात्रक यांनी केली.
कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला मुंबईत वर्षा बंगल्यासमोर विष प्राशन करण्याचा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले, मॉन्टेकार्लो कंपनीने रस्त्याचे काम करताना चोरीची वाळू वापरल्याची तक्रार करत तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले होते.