अज्ञात वाहनाच्या धडकेत आई आणि मुलाचा मृत्यू.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- कोल्हार महामार्गावरील अस्मिता डेअरी फाट्यावर रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दाढ बुद्रुक (ता. राहाता) शिवारातील तांबेगोठा येथील महंमद उर्फ अफ्रोज कासम शेख व फरीदा कासम शेख या माय लेकांचा मृत्यू झाला.

रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महंमद शेख व त्याची आई फरीदा हे सादतपुर येथील पाहुण्यांना भेट देऊन दुचाकीवरुन निमगावजाळी शिवारातील अस्मिता डेअरीजवळून आपल्या घरी चालले होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात अफ्रोज शेख हा घटनास्थळी ठार झाला, तर आई फरीदा गंभीर जखमी झाली होती. ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हालविले होते; परंतु त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला.

अफ्रोज हा कासम शेख यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात वडील, बहीन, चुलते व चुलतभाऊ असा परिवार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24