अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार (दि. 15 जानेवारी) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी एकूण 85 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
90 ग्रामपंचायतींसाठी 297 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात 12.67 टक्के तर 11.30 वाजेपर्यंत 33.74 टक्के
तर दुपारी 1.30 पर्यंत एकूण 55.77 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर 1.30 ते 3.30 या दोन तासांच्या कालावधीत जवळपास 20% मतदान झाले.
त्यामुळे 3.30 वाजता एकूण 72.82 टक्के मतदान झाले. त्यामुळे ह्यावर्षी विक्रमी मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये महिला मतदारांची सरासरी पुरुषांपेक्षा जास्त आहे. पुरुष मतदान 71.52 तर महिला मतदान 74.26 टक्के झाले.