स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेरने पटकावला ५ वा क्रमांक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिकेला पश्चिम विभागातील ६ राज्यांमधून पाचवा क्रमांक मिळाला आहे.

पाचवा क्रमांक मिळाला. ओला कचरा, सुका कचरा, घंडागाडी, खत व उद्यान निर्मिती, शैचालये व एक रुपयात १ लिटर स्वच्छ पाणी या उपक्रमांची देशपातळीवर दखल घेण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने लोकाभिमुख काम करून राज्यात ठसा उमटवला.

नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी स्वच्छतेबाबत जागृती करुन स्वच्छ व हरित संगमनेर बनवले. शहरात वैभवशाली इमारतींसह २८ नवीन गार्डनची निर्मिती, बाह्यवळण रस्ता, प्रवरा नदीवर चार पूल, रस्ते, भूमिगत गटारी, मोकळ्याा जागांमध्ये वृक्षारोपण अशा विविध विकास कामांची दखल घेत महाराष्ट्र सरकारने नगरपालिकेचा विविध पुरस्कारांनी गौरव केला.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाचा पालिकेस दोनदा पुरस्कार मिळाला आहे. गतिमान प्रशासनाचाही पुरस्कारासह पालिकेला वन स्टार मानांकन मिळाले असून ओडीएफचे प्लस सर्टिफिकेशन प्राप्त झाले आहे. केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानात नगरपालिका सहभागी झाली होती.

महाराष्ट्रातून ३२३ नगर पालिकांनी सहभाग नोंदवला. पालिकेने राबवलेले घनकचरा व्यवस्थापन शहरातील स्वच्छता, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कंपोस्ट खत प्रक्रिया, कचरा विल्हेवाट शासन नियमाप्रमाणे केली जात आहे. पालिका कर्मचारी २४ तास स्वच्छतेवर भर देत कोरोनात नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिक काम केले आहे.

या सर्व्हेक्षणात शहरातील १६ हजार नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. याची दखल घेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा या राज्यातून सहभाग घेतलेल्या सर्व नगरपालिकांमधून नगरपालिकेला पाचवा क्रमांक मिळाला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24