विकास कामात राजकारण न करता निधी आणणार : आ. जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील विकास कामाचे नियोजन करावे. विकास कामात पक्षीय राजकारण आणणार नाही, सर्व भागाचा समतोल विकास साधावा यासाठी नगर शहरात आता मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे. 

उपनगराच्या विकास कामाला चालना मिळाली आहे. आता जुन्या शहरात गावठाण भागात नियोजन करून विकासकामे केली जाणार आहेत. नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
जुन्या शहरातील खोदाईची कामे फेज २ व भुयारी गटार कामे लवकर पूर्ण करणार असून त्यानंतर संपूर्ण शहरातील रस्त्याची कामे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून बेलदार गल्ली येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ उपमहापौर मालन ढोणे यांच्या हस्ते झाला आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24