अहमदनगर – आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने सांगली, कोल्हापूर मधील पुरग्रस्तांच्या मदत जमा करण्याचे अभियान सुरु करण्यात आले.
शहरातील प्रत्येक भागात जाऊन मदत जमा करणार्या वाहनात जीवनावश्यक वस्तूची मदत देत या उपक्रमाची सुरुवात आ.संग्राज जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, संतोष लांडे, दत्ता तापकिरे, बबलू सूर्यवंशी, संभाजी पवार, मोहन गुंजाळ, राहूल सांगळे, ओंकार घोलप, लंकेश चितळकर, राहुल नेटके, तौसिफ खान, शेहजाद खान, ओंकार थोरात, सागर बोरुडे, स्वप्निल भोरे, अविनाश जोशी, अनिकेत वडागळे, अजय खरात, शाहनवाज शेख आदी उपस्थित होते.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातले असताना अनेक गावे पाण्याखाली गेली असून, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यांना मदतीची गरज असून, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभवजी ढाकणे यांच्या संकल्पनेतून मदत जमा करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे. सदर वाहन शहरातील प्रत्येक भागात जाऊन ब्रश – पेस्ट, हेअर ऑईल, साबण, जुने-नवे पण चांगले कपडे (स्वेटर, टी शर्ट / शर्ट), अंथरूण पांघरून, अन्न-धान्य, बिस्किटे, पाणी बॉटल, औषधे आदिंसह जीवनावश्यक वस्तू मदत स्वरुपात स्विकारणार आहे.
तर ही मदत प्रत्यक्ष सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना दिली जाणार आहे. नगरकरांना पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वैभव ढाकणे 9370091515 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.