आ.संग्राम जगतापांची बदनामी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- सोशल मीडियावरील फेसबुक अकाऊंट होल्डर सुजयपर्व, विनायक सोबले आणि डॉ. सुजय दादा विखे पाटील फँन्स यांनी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची बदनामी करणारा, चारित्रहनन करणारा मजकूर टाकला असून

त्याबाबत निवडणूक आयोगाकडे सीव्हीजल ॲपद्वारे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केल्याची माहितीॲड. प्रसन्ना जोशी, नीलेश बांगरे यांनी दिली.

चारित्रहनन करणारा मजकूर टाकला असून त्याबाबत निवडणूक आयोगाकडे सीव्हीजल ॲपद्वारे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केल्याची माहितीॲड. प्रसन्ना जोशी, नीलेश बांगरे यांनी दिली.

हॉटेल राज पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना जोशी म्हणाले, नगर लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, सद्यस्थितीत निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे.

सोशल मीडियाद्वारे लोकप्रतिनिधींचे चारित्रहनन, मतदारांना भीती दाखविणे, प्रलोभन देणे, खोटी माहिती खरी असल्याचे भासवून प्रसिद्ध करणे आचासंहितेचा भंग आहे.

या सर्व गोष्टींना आळा बसविण्यासाठी सीव्हीजल ॲपवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24